सावंतवाडी: सावंतवाडीतील 'ओंकार' हत्तीवर पेटती मशाल फेकल्याप्रकरणी ७ कर्मचाऱ्यांना नोटीस
सावंतवाडी तालुक्यातील कास गावात शांततेत असलेल्या 'ओंकार' हत्तीवर पेटती मशाल फेकल्याचा व्हिडिओ समोर आल्यावर वन्यजीवप्रेमींनी संताप दर्शविला. वनपरिक्षेत्राने ७ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून घटना सध्या तपासात आहे.