जालना: अल्पवयीन मुलगी संभ्रमित व चिंताग्रस्त अवस्थेत आढळली; ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 15 वर्षीय मुलीला आरपीएफकडून सुरक्षित
Jalna, Jalna | Aug 15, 2026 जालना रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन चाईल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आले. शनिवार दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जालना रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 जवळील पिटलाईन व रेल्वे यार्ड परिसरात गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ, हेड कॉन्स्टेबल यू. आर. दोभाल आणि कॉन्स्टेबल जितेंद्र यांना एक मुलगी आढळली.