जालना: दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकर्यांना प्रशासनाचा आधार; जिल्ह्यातील 860 गावांत ‘शेतकरी संवाद सभा’ संपन्न
Jalna, Jalna | Oct 2, 2026 दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील 860 गावांमध्ये ‘शेतकरी संवाद सभा’ घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून प्रशासनाने गावपातळीवर शेतकर्यांशी थेट संवाद साधण्यात आला. शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकर्यांना भेडसावणार्या विविध समस्यांची माहिती देण्यात आली.