सेवा संकल्प अभियान | आरोग्य मेळावा 🏥
प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगाव येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत भव्य आरोग्य मेळावा
3.5k views | Gondia, Maharashtra | Sep 25, 2026 🏥 सेवा संकल्प अभियान | आरोग्य मेळावा 🏥 प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगाव येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तचाचणीसह विविध आरोग्य तपासण्या, उच्च रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, आवश्यक आरोग्य तपासण्या, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यक उपचार व औषधोपचाराच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमाचा १०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. नागरिकांना विविध आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत हा आरोग्य मेळावा उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. 🌿 “सेवा हीच संकल्पना, आरोग्य हीच प्राथमिकता!” 🌿 प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगाव ता. आमगाव, जि. गोंदिया 🏥💚