भिवापूर: आलेसूरच्या महिलांचा स्वावलंबी शेतीकडे आदर्श पाऊल; दशपर्णी अर्काची स्वतः फवारणी
सुरक्षा महिला बचत गटातील महिलांनी शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करत दशपर्णी अर्काची स्वतः फवारणी करून महिला सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेतीसोबत पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देत या महिलांनी स्वतः पुढाकार घेत दशपर्णी अर्काची फवारणी केली. महिलांनी केवळ बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन न साधता शेतीतील विविध कामांमध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे.