भंडारा: मोहदुरा शिवारात ट्रान्सफॉर्मरमधून २० हजारच्या ऑईलची चोरी
भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा शिवारात ट्रान्सफॉर्मरमधील १७१ लिटर विद्युत ऑईल चोरी झाली. शहापूर वीज वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता सचिन आजबले यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.