जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे सेवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात भटक्या-विमुक्त प्रवर्गातील २०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह प्रांताधिकारी योगेशकुमार मीणा यांची प्रमुख उपस्थिती होती.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews