नागपूर शहर: विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात नागपूर जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम संपन्न झाला यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.नागपूर जिल्ह्यामध्ये सिंचन, आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाला नवी गती देण्यात येत आहे. जिल्ह्यात ६० AI अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या असून, या उपक्रमामुळे कुपोषणात ७६ टक्के घट झाली आहे.