जालना: जालना जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली; चारा वाहतुक व विक्रीस बंदी; हिरवा चारा, कडबा, कुट्टी सह आदीवर निर्बंध
Jalna, Jalna | Oct 1, 2026 जालना जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत ‘ट्रिगर-1’ (प्रथम टप्पा) दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्याच्या हद्दीतून अन्य जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचा सुका अथवा ओला चारा वाहतूक करून नेण्यास तसेच विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आदेश दिलेत.