जालना: जल्लोषात वर्धापन दिन; नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष? दिव्यांग योजनांनाही प्राधान्य नसल्याचा आरोप
Jalna, Jalna | Aug 7, 2026 जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जालना महानगरपालिकेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, आयुक्त अंजली शर्मा, स्थायी समितीचे सभापती अशोक अण्णा पांगाळकर, नगरसचिव केशव कानपुडे तसेच नगरसेवक महावीर ढाक्का, अक्षय गोरंट्याल, अमोल ठाकूर, कपिल भुरेवाल आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपमहापौर राजेश राऊत यांनी आपल्या भाषणात महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. "महापौर वंदना मगरे