बदनापूर: रिधोरा तळेगाव परिसरामध्ये आमदार नारायण कुचे यांनी केली शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी
Badnapur, Jalna | Sep 30, 2026 आज दि.30 सप्टेंबर 2026 वार बुधवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भा. ज.पार्टी महायुतीचे आ.नारायण कुचे यांनी मतदारसंघातील रिधोरा तळेगाव यासह इतर भागांमध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी थेट बांधावर जात केली, दीड महिना झाला पाऊस नाही, खरिपात पेरलेली सोयाबीन, मका, तूर,कपाशी पिके सर्व जळाली आहे, त्यामुळे शेतकरी खचला आहे,या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व सरकार तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही देण्यासाठी आमदार नारायण कुचे यांनी ही पाहणी केली आहे.