भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसबीआय बँकेत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी केली गर्दी
आज दि.1आक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एसबीआय बँकेत परिसरातील शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे ही गर्दी पीक कर्जासाठी केली असून, तर दुसरीकडे सरकारने नुकतीच कर्जमाफी केली आहे या कर्जमाफीच्या यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी व नवीन पीक कर्ज मिळवण्यासाठी ही गर्दी केली असून सर्वांचे कागदपत्र तपास लवकरच नवीन पीक कर्ज दिली जाईल अशी माहिती शाखा अधिकारी नचिकेत देशपांडे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.