Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

अलिबाग: आंबेपूर मतदार संघात शिवसेनेची रॅली मोटार सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद शेकडो शिवसैनिक रॅलीत सहभागी

Alibag, Raigad | Feb 5, 2026
जिल्‍हा परीषद निवडणूक प्रचाराच्‍या शेवटच्‍या दिवशी अलिबागच्‍या आंबेपूर मतदार संघातील शिवसेनेच्‍या उमेदवार रसिका केणी यांच्‍या प्रचारासाठी संपूर्ण मतदार संघात मोटार सायकल रॅली काढण्‍यात आली. शिवसेना रायगड जिल्‍हा प्रमुख राजा केणी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सांबरी इथं रॅलीला प्रारंभ झाला. संपूर्ण मतदार संघात फिरून दुपारी रॅलीची सांगता झाली. या रॅलीत शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. मोटार सायकलला लावलेल्‍या भगव्‍या झेंडयांमुळे वातावरण भारावून गेले होते. सहभागी शिवसैनिक जोरदार घोषणा देत होते. शिवसेना झिंदाबाद, आमदार महेंद्र दळवी आगे बढो, राजा केणी आगे बढो, हम तुम्‍हारे साथ है अशा घोषणांनी परीसर दुमदुमुन गेला होता. रॅलीच्‍या मार्गावर फटाक्‍यांच्‍या आतषबाजीत जोरदार स्‍वागत केले.