दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी मा.पोलीस आयुक्त, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. ; सोलापूर येथे आयोजित सायबर क्राईम अवेअरनेस कार्यशाळेत सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री.अविनाश पाटील, महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे, पो.कॉ.अंबलगी यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे तसेच सायबर गुन्ह्यांपासून घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले. आपला मोबाईल सायलेंटवर असताना देखील हॅकर्स कशाप्रकारे आपल्या मोबाईलचा कॅमेरातून व माइक चा वापर करून अप्रत्यक्षरीत्या मोबाईलचा ताबा मिळू शकतात याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच KYC Scam, OTP Fraud, Digital Arrest, Remote Access, फेक कॉल्स, फिशिंग लिंक व ऑनलाइन बँकिंग फसवणुकीच्या विविध पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यशाळेस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ, जेष्ठ विधीज्ञ श्री मिलिंद थोबडे साहेब आणि बँकेचे सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
56 views | Solapur, Maharashtra | Sep 21, 2026