यावल: यावलच्या मदिना व कृष्णतारा नगरात 98 लाखांहून अधिक विकासकामांचे भूमिपूजन
Yawal, Jalgaon | Sep 29, 2026 यावल शहरातील मदिना नगर आणि कृष्णतारा नगरमध्ये एकूण 98 लाखांहून अधिक निधीने रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण आणि गटारी बांधण्यात येणार आहेत. मंगळवारी नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्या हस्ते या विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.