नागपूर ग्रामीण: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथे केला नागरिकांशी थेट संवाद
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी, जिल्हा नागपूर येथे विविध विषयांवरील मागण्यांची निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांसोबत थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित प्रत्येकाची समस्या व मागणी अत्यंत आस्थेने समजून घेतली.नागरिकांच्या अडीअडचणी आणि मागण्यांवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.