नागपूर ग्रामीण: थरारक! जबरी चोरीच्या संशयावरून घरात घुसलेल्या तरुणाचा संतापलेल्या जमावाकडून मारहाणीत मृत्यू
नागपूरमधील बेलत रोडी परिसरात जबरी चोरीच्या संशयावरून दोघा जणांना संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुमेध राजेंद्र गजभिये याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार दीपक पाटील संधी साधून पळून गेला.मंगळवारी दुपारी दोन जण घरात घुसले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून उषा धार्मिक यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्यामुळे जमावाने संशयितांना पकडले आणि त्यांना मारहाण केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन जणांना ताब्यात घेतले.