नागपूर ग्रामीण: डिगडोह नगर परिषदेतर्फे स्वच्छता अभियान
शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने डिगडोह नगर परिषदेतर्फे आज विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले.या अभियानांतर्गत उपाध्यक्ष विनोद ठाकरे व नगरसेवकांनी स्वतः हातात झाडू घेऊन मार्गाच्या दुतर्फा साफसफाई केली. रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा, वाढलेली झाडाझुडपे आणि परिसरातील अस्वच्छता याद्वारे दूर करण्यात आली