नागपूर ग्रामीण: झोमॅटो बॉयचा बनाव; नागपुरात भरदिवसा घरात घुसून महिलांना लुटले, संशयिताच्या मृत्यूप्रकरणी चर्चा
नागपूरमधील बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू मनीष नगर भागात एका चोरीचा थरारक प्रकार समोर आला आहे. झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय बनून आलेल्या चोरट्यांनी पार्सल देण्याच्या बहाण्याने उषा धार्मिक यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना कपड्याने बांधून आणि चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र व दागिन्यांची लुटमार केली.दरम्यान, बाजूच्या खोलीतील सून प्रणाली यांनी प्रसंगावधान राखत आतून दार लावले आणि नातेवाईकांना फोन केल्याने नागरिक जमा झाले.