जालना: जमिनीच्या वादातून मूळ मालक कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघे गंभीर जखमी; खोडेपुरी शिवारातील गट क्र. 34 मधील घटना
Jalna, Jalna | Oct 2, 2026 जालना तालुक्यातील खोडेपुरी शिवारातील गट क्रमांक 34 मधील शेतजमिनीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादातून मूळ जमीनमालक कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात राजू म्हस्के, अजय म्हस्के आणि जोजीत म्हस्के (रा. पिंपरी डुकरी) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाने काही दिवसांपूर्वी आपली शेतजमीन बटाईने दिली होती.