जालना: प्रभाग क्रमांक 6 मध्ये घाणीचे साम्राज्य; चारही नगरसेवक भाजपचे, तरी नागरिकांच्या वाट्याला अस्वच्छता!; जनतेला स्वच्छता कधी
Jalna, Jalna | Oct 4, 2026 जालना शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा, ठिकठिकाणी पडलेला कचर्याचा ढिगारा, दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवार दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रभागातील चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असून, त्यापैकी एक नगरसेवक माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत.