जालना: सोळा वर्षीय मुलीचा पाठलाग करून अश्लील बोलणार्या आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी; 15 हजार रुपये दंड
Jalna, Jalna | Aug 11, 2026 सोळा वर्षीय मुलीचा सहा महिन्यांपासून पाठलाग करून तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी करणे, अश्लील कॉल करणे तसेच धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मंगळवार दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी हा निकाल दिला. वरद उर्फ पुरुषोत्तम साईराज नायडू (वय 21, रा. कानडी मोहल्ला, जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.