जालना: जालना शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्याची मागणी;मोकाट जनावरे व अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
Jalna, Jalna | Aug 16, 2026 जालना शहरातील बेशिस्त वाहतूक, जड वाहनांची वाढती वर्दळ, मोकाट जनावरे आणि अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रविवार दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वीस वर्षांपासून शहरातील वाहतुकीबाबत विविध अर्ज व तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.