जालना: सरकारला बदनाम करण्याचा डाव? महामंडळाच्या एमडींवर नरेंद्र पाटलांचा घणाघाती आरोप; अध्यक्षपद सोडण्याचाही दिला इशारा
Jalna, Jalna | Aug 8, 2026 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावरून आता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे. व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांच्या मनमानी निर्णयांमुळे मराठा समाजातील युवकांना कर्जापासून वंचित राहावे लागत असून, या माध्यमातून शासनाबद्दल समाजात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. सरकारला बदनाम करण्यासाठी कुणीतरी अधिकार्याच्या माध्यमातून डाव रचत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.