सावनेर: नागपूर जिल्ह्यात कृषी क्रांती! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे 5134 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज
Savner, Nagpur | Aug 10, 2026 ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवा आर्थिक आणि तांत्रिक बळकटपणा देण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून राज्य शासनाने हाती घेतलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 नागपूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणत आहे या अत्यंत महत्त्वकांक्षी योजनेमुळे जिल्ह्यातील 5134 शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी रात्री अपरात्रीच्या कष्टापासून मुक्त होत दिवसा अखंडित खात्रीशीर आणि भरोशाचा वीज पुरवठा मिळू लागला आहे