गोंदिया आरोग्य बातमी: 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' - ३० वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी!
2.3k views | Gondia, Maharashtra | Sep 20, 2026 सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया यांच्यातर्फे जिल्ह्यातील ३० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुष व महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवली जात आहे. प्रमुख तपासण्या व सुविधा: १. मधुमेह (Sugar) व उच्च रक्तदाब (BP) तपासणी २. कर्करोग पूर्व तपासणी (तोंड, स्तन व गर्भाशय मुख) ३. वेळेत निदान आणि आवश्यक मोफत उपचार "एक पाऊल माझे, एक पाऊल तुझे... निरोगी गाव घडवूया!" या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया