जालना: इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटी गठित करण्याची मागणी
Jalna, Jalna | Aug 14, 2026 नांदेड दूध डेअरी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ इंद्रजीतसिंग बलजीतसिंग बावरी यांची हत्या झाल्याच्या प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात यावे, अशी मागणी सिकलीकर सिख समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शुक्रवार दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.