जालना: अंबड चौफुलीवर रुग्णवाहिका आणि कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
Jalna, Jalna | Aug 12, 2026 जालना शहरातील अंबड चौफुली येथे रुग्णवाहिका आणि मोटारीची धडक होऊन अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात सोडून परत जात असताना आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला या अपघाताला सामोरे जावे लागले. परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका क्रमांक एमएच 14 सीएल 0548 या गाडीचा अपघात झाला.