भिवापूर: टाका,धापरळा, जवळी व ताटोळीत वृक्षारोपण, हरित भविष्याचा संकल्प
भिवापूर तालुक्यातील टाका, धापरळा (डोये), जवळी व ताटोळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्गाचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.