सावनेर: खापरखेडा परिसरात आढळून आला स्वस्त राशन दुकानात खराब व सडलेला तांदूळ
Savner, Nagpur | Sep 28, 2026 ग्रामीण भागातील सरकारी रास्त भाव धान्याच्या दुकानांमध्ये खराब, सडलेला आणि खडे असलेला तांदूळ वितरीत होत असल्याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी (DSO) आदरणीय पडोळे सर आणि सावनेरचे अन्न निरीक्षक (IO) आदरणीय गजभिये सर यांच्याकडे या गंभीर विषयावर तक्रार नोंदवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून आजपासून असा खराब तांदूळ मिळणे बंद होईल.