भोकरदन: गारखेडा देवी येथे मुख्य रस्त्यावर साचले पावसाचे पाणी, गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात
आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील गारखेडा देवी येथे मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचले असल्याचे पाहायला मिळाले आहे, या पावसाच्या पाण्यामुळे व सांडपाण्यामुळे नागरिकांची व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून हे पाणी जिल्हा परिषद शाळा तसेच नागरिकांच्या घरापर्यंत येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून याकडे संबंधित ग्रामपंचायत व संबंधित विभागाने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे.