📣 नांदेडमध्ये 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान; ऑगस्ट महिन्यात विविध उपक्रम
665 views | Nanded, Maharashtra | Aug 5, 2026 आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड तर्फे ऑगस्ट २०२६ या महिन्यात 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' ही व्यापक मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत कीटकजन्य रोग सर्वेक्षण, कुष्ठरोग शोध व जागरूकता, २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्ररोग जागरूकता आणि १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग शोध मोहीम राबवण्यात येईल. या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपलं गाव निरोगी बनवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी १०४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. #NandedNews #HealthUpdate #PublicHealth #ArogyaAbhiyan #NandedZP