जालना: अंडापाव खाण्यावरून वाद; मंठा चौफुली परिसरात तरुणावर चाकूने हल्ला; तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Aug 15, 2026 मंठा चौफुली परिसरातील क्रिटीकल हॉस्पिटलसमोर अंडापाव खात असलेल्या तरुणाला किरकोळ कारणाच्या वादातून चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. शनिवार दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी अशोक एकनाथ म्हस्के रा. देवमूर्ती, ता. जालना यांच्या फिर्यादीवरुन तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हस्के यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ते मंठा चौफुली येथील क्रिटीकल हॉस्पिटलसमोर अंडापाव खात होते. त्यावेळी ही मारहाण झाली.