भिवापूर: सालेभोहरी पुनर्वसनातील पाण्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार
भिवापूर तालुक्यातील सालेबहरी साले भट्टी पुनर्वसन वसाहतीतील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आणि अपूर्ण नागरी सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले आहे पुनर्वसन होऊन अनेक वर्ष उलटूनही नागरिकांना शुद्ध व कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे