गोंदिया: गोंदियात मायक्रोबायोलॉजीवर विशेष जनजागृती कार्यक्रम यशस्वी
Gondiya, Gondia | Sep 29, 2026 गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात रेड रिबन क्लब आणि युथ रेड क्रॉस क्लबच्या संयुक्त विद्यमाने रावणवाडी GES हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष आणि जिल्हा रुग्णालयाने सहकार्य केले.