नागपूर शहर: नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्यावर नागरिकांची मोठी गर्दी, बघा थरारक वायरल व्हिडिओ
स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरमधील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. या किल्ल्याला भेट देण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती, परंतु या गर्दीमुळे येथे चेंगराचेंगरीसारखी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. गर्दीच्या रेट्यामुळे लोक खाली पडताना दिसत आहेत, तर काही लोक एकमेकांना सावरताना दिसत आहेत.