महा..राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींच्या कारभारात लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांचा वाढता हस्तक्षेप आता प्रशासनाच्या रडारवर आला आहे. नव्या विधेयकानुसार आता, लोकप्रतिनिधींच्या वतीने पती, मुले किंवा नातेवाइकांनी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणणे गुन्हा मानला जाणार आहे.