Public App Logo
Profile Picture

पुणे शहर पोलीस

@punecitypolice
165Followers
0Following
Through his lens, truth was the way forward.
 
Remembering the man who taught the world to see strength in principles and courage in non-violence.

<nis:link nis:type=tag nis:id=truthcouragenonviolence nis:value=TruthCourageNonViolence nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=gandhijayanti2026 nis:value=GandhiJayanti2026 nis:enabled=true nis:link/>
साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असणाऱ्या भारतरत्न लाल बहादूर शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 

<nis:link nis:type=tag nis:id=लाल_बहादूर_शास्त्री_जयंती nis:value=लाल_बहादूर_शास्त्री_जयंती nis:enabled=true nis:link/>
अवैध अंमली पदार्थ विक्रीविरोधात कारवाई करत युनिट ०६, गुन्हे शाखेने दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस गांजासह ताब्यात घेतले.

मांजरी परिसरात केलेल्या कारवाईदरम्यान आरोपीकडून एकूण २८०.४ ग्रॅम वजनाचा गांजा व टीव्हीएस मोपेड, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹७६,०२० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
फुरसुंगी परिसरात अवैधरित्या सुगंधित तंबाखू/जर्दा निर्मिती करणाऱ्या ठिकाणी गुन्हे शाखा युनिट ०५ व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे छापा टाकत २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत सुगंधित तंबाखू पदार्थांचे ५९ बॉक्स, पाऊच पॅकिंग मशीन, रोझ वॉटर, मेंथॉल बॉक्स, ग्लिसरॉल कॅन तसेच नामांकित कंपनीचे १,०८० चीज डबे असा एकूण ₹३१,९१,६०८/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

<nis:link nis:type=tag nis:id=punecitypolice nis:value=PuneCityPolice nis:enabled=true nis:link/>
भवानी पेठ येथून दुचाकी चोरीला गेल्याविषयी खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी हा तडीपार असल्याचे निदर्शनास आले. त्यास कोंढवा परिसरातून ताब्यात घेत त्याच्याकडून ₹७०,००० किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

<nis:link nis:type=tag nis:id=punecitypolice nis:value=PuneCityPolice nis:enabled=true nis:link/>
रविवार पेठ येथून बुलेट दुचाकी अज्ञात इसमाने चोरीला गेल्याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी ४८ तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली. यावेळी आरोपीकडून चोरीस गेलेली ₹३०,००० किंमतीची बुलेट दुचाकी हस्तगत करण्यात आली.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
A match that makes Pune’s roads safer? We’re here for it. 

Keep choosing safety. Keep following traffic rules.

<nis:link nis:type=tag nis:id=punetrafficpolice nis:value=PuneTrafficPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=RoadSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficrules nis:value=TrafficRules nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safepune nis:value=SafePune nis:enabled=true nis:link/>
अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगणे म्हणजे आपले खाते स्वतःहून दुसऱ्याच्या स्वाधीन करणे.

<nis:link nis:type=tag nis:id=रहा_सायबर_सुरक्षित nis:value=रहा_सायबर_सुरक्षित nis:enabled=true nis:link/>
नशेच्या गर्तेतून बाहेर येण्याची आणि स्वतःचे आयुष्य वाचवण्याची संधी तुमच्याच हातात आहे. वेळीच सतर्क व्हा आणि नशामुक्त आयुष्य जगा!

<nis:link nis:type=tag nis:id=ड्रग्जमुक्त_पुणे nis:value=ड्रग्जमुक्त_पुणे nis:enabled=true nis:link/>
आयुष्य कसे जगायचे, ही निवड प्रत्येकाची असते. नशेच्या आहारी जाऊन आयुष्य गमवण्यापेक्षा, स्वप्नं, नाती आणि आनंद जपत नशाविरहित आयुष्य जगण्याची निवड करा.

<nis:link nis:type=tag nis:id=नशा_नाही_आयुष्य_निवडा nis:value=नशा_नाही_आयुष्य_निवडा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punepolice nis:value=PunePolice nis:enabled=true nis:link/>
गणपती विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला. १५ आरोपींना अटक करत २२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, सोन्याचे दागिने, मोबाईल व पर्ससह सुमारे ₹३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

<nis:link nis:type=tag nis:id=punecitypolice nis:value=PuneCityPolice nis:enabled=true nis:link/>
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत मोबाईल फोन चोरी करणाऱ्या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या ११ आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून ६३ मोबाईल फोन, १ कार, व इतर साहित्य असा एकूण ₹३०,५७,०४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

<nis:link nis:type=tag nis:id=punecitypolice nis:value=PuneCityPolice nis:enabled=true nis:link/>
३२ हून अधिक तासांचा अखंड बंदोबस्त…

मिरवणूक सुरळीत पार पडली, नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवत पुणे पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावली. 

कर्तव्याला वेळेची मर्यादा नसते.

<nis:link nis:type=tag nis:id=punepolice4all nis:value=PunePolice4All nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganpativisarjan2026 nis:value=GanpatiVisarjan2026 nis:enabled=true nis:link/>
गणेशोत्सवातील भव्य मिरवणुका, लाखोंची गर्दी आणि सुरळीत वाहतुकीचे नियोजन हे मोठे आव्हान असते. मात्र पुणे पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडली.

निर्विघ्न व सुरक्षित सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पुणेकरांचे मनःपूर्वक आभार! 

<nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav2026 nis:value=Ganeshotsav2026 nis:enabled=true nis:link/>
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांचे आयुष्य सुखसमृध्दीने भरून जावो, हीच सदिच्छा!

<nis:link nis:type=tag nis:id=अनंत_चतुर्दशी_२०२६ nis:value=अनंत_चतुर्दशी_२०२६ nis:enabled=true nis:link/>
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणासंदर्भात तक्रार आहे?

ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने कारवाईसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ध्वनी प्रदूषणासंदर्भात तक्रार असल्यास आपल्या परिसरातील संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

शांततेत विसर्जन… पर्यावरणाचे रक्षण!
नागरिकांच्या सहकार्याने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण.

<nis:link nis:type=tag nis:id=punepolice nis:value=PunePolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshvisarjan2026 nis:value=GaneshVisarjan2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=noisepollution nis:value=NoisePollution nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganpatibappamorya nis:value=GanpatiBappaMorya nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punecitypolice nis:value=PuneCityPolice nis:enabled=true nis:link/>
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्यायी रिंग रोड वापरा आणि आपला प्रवास सुखकर करा!

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
ताण घालवण्यासाठी धूम्रपान करण्याची सवय मोडण्याची सुबुद्धी देण्यासाठी आपला लाडका धूम्रवर्ण आला आहे!

या गणेशोत्सवात वाईट सवयींचा त्याग करून आनंदी आणि निरोगी आयुष्याची निवड करा.

<nis:link nis:type=tag nis:id=संयम nis:value=संयम nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=आनंदी_गणेशोत्सव nis:value=आनंदी_गणेशोत्सव nis:enabled=true nis:link/>
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्यायी रिंग रोड वापरा आणि आपला प्रवास सुखकर करा!

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
पुणेकर, या गणेशोत्सवात फोनचा अतिवापर टाळा आणि हा सण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने साजरा करा. कारण, कुठल्याही गोष्टीचे व्यसन मोडण्यासाठी ‘संयम’ महत्त्वाचा असतो. 

<nis:link nis:type=tag nis:id=संयम nis:value=संयम nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=आनंदी_गणेशोत्सव nis:value=आनंदी_गणेशोत्सव nis:enabled=true nis:link/>
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांकडून धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा आणि ससाणेनगर-हडपसर परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.  
प्रवासाला निघण्यापूर्वी खालील रस्ते बदल व पर्यायी मार्गांची माहिती घ्यावी ही विनंती.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी २५ व २६ सप्टेंबर दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांवर बदल आणि रस्ते बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.  
आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी खालील प्रमुख बंद रस्ते व वेळांची माहिती घ्या.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
पुणेकरांनो! गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. या बंद रस्त्यांऐवजी शहरात प्रवास करण्यासाठी पुणे पोलिसांतर्फे डायव्हर्शन पॉईंट्स आणि रिंग रोडचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
पुणेकरांसाठी महत्त्वाचे! गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ट्रॅफिकची कोंडी टाळण्यासाठी पुढील पार्किंगची ठिकाणे उपलब्ध करण्यात आली आहेत.  
नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्क न करता ठरवून दिलेल्या ठिकाणीच पार्क करावीत ही विनंती.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
पुणेकरांनो, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत खालील प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो-पार्किंग घोषित करण्यात आले आहे.
नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>