Public App Logo
Profile Picture

पालघर पोलीस

@Sp_palghar
1966Followers
17Following
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड करत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली.

गुन्ह्यात वापरलेला हातोडा व मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
बोईसर परिसरातील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावला. तपासातून आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कूटी जप्त करण्यात आली आहे.

सतर्क राहा, संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.

<nis:link nis:type=tag nis:id=crime_detection nis:value=crime_detection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=palgharpolice nis:value=Palgharpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapoliceheadquarter nis:value=maharashtrapoliceheadquarter nis:enabled=true nis:link/>
सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा.

सतर्क रहा, सुरक्षित रहा !

 <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersecurity nis:value=cybersecurity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberalert nis:value=CyberAlert nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapoliceheadquarter nis:value=maharashtrapoliceheadquarter nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=palgharpolice nis:value=Palgharpolice nis:enabled=true nis:link/> police
सुरक्षेच्या कारणास्तव विनापरवाना ड्रोन उडविल्यास पालघर पोलीस दल कारवाईस सज्ज
अनंत चतुर्दशीच्या पावन निमित्ताने विघ्नहर्त्याला भक्तिभावाने निरोप देऊया. 
पुढच्या वर्षी पुन्हा नव्या उत्साहात भेटण्याच्या आशेसह, उत्सव साजरा करताना सुरक्षिततेचीही काळजी घेऊया. 

पालघर पोलीस दलातर्फे अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
वाहतूक नियमांचे पालन करण्याची सद्बुद्धी गणपती बाप्पा आपल्याला देवो, हीच प्रार्थना.

पुढच्या वर्षी लवकर या!

<nis:link nis:type=tag nis:id=अनंत_चतुर्दशी_२०२६ nis:value=अनंत_चतुर्दशी_२०२६ nis:enabled=true nis:link/>
ATM वापरताना थोडीशी सतर्कता मोठी फसवणूक टाळू शकते.
मशीनमध्ये अडचण आली तरी अनोळखी व्यक्तीच्या सूचनांवर विश्वास ठेवू नका. तुमचा PIN, कार्डची माहिती किंवा इतर गोपनीय तपशील कोणालाही सांगू नका.

संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित बँक किंवा पोलिसांशी संपर्क साधा.

सतर्क राहा, सुरक्षित व्यवहार करा.

 <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersecurity nis:value=cybersecurity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberalert nis:value=CyberAlert nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapoliceheadquarter#palgharpolice nis:value=maharashtrapoliceheadquarter#Palgharpolice nis:enabled=true nis:link/> police PublicSafety ATMfroudसतर्क_राहा सुरक्षित_राहा
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने घाबरवणाऱ्या कॉलपासून सावध रहा.
कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही तरतूद नाही.

भीती दाखवून किंवा खोटे आरोप करून पैसे उकळण्याचा हा सायबर गुन्हेगारांचा डाव असू शकतो.
स्वतः सतर्क रहा आणि आपल्या कुटुंबीयांनाही याबाबत जागरूक करा.

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर कॉल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=सतर्क_राहा nis:value=सतर्क_राहा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सुरक्षित_राहा nis:value=सुरक्षित_राहा nis:enabled=true nis:link/>
महिलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य वेळी मदत मिळणं खूप महत्त्वाचं आहे.
प्रवासात किंवा कुठल्याही ठिकाणी असुरक्षित वाटल्यास दुर्लक्ष करू नका. 

तातडीच्या मदतीसाठी ११२ वर कॉल करा.

पालघर पोलीस महिलांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.

<nis:link nis:type=tag nis:id=तात्काळ_मदत nis:value=तात्काळ_मदत nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=डायल_११२ nis:value=डायल_११२ nis:enabled=true nis:link/>
बाप्पाच्या आरतीला जसे एकत्र येता, तसेच एकत्र मिळून नियम पाळाल, तर मला अधिक प्रसन्न वाटेल. 

<nis:link nis:type=tag nis:id=बाप्पा_म्हणे nis:value=बाप्पा_म्हणे nis:enabled=true nis:link/>
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत, नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस बंदोबस्तासाठी सुसज्ज आहेत.

उत्सव बाप्पाचा, जबाबदारी सुरक्षेची!

<nis:link nis:type=tag nis:id=आपले_मपो nis:value=आपले_मपो nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गणेशोत्सव_२०२६ nis:value=गणेशोत्सव_२०२६ nis:enabled=true nis:link/>
कुठेही क्लिक करण्यापूर्वी नेहेमी विचार करा. अनोळखी लिंक दिसल्यास चौकस नजर ठेवून केलेली चौकशी फायदेशीर ठरू शकते. 

<nis:link nis:type=tag nis:id=बाप्पा_म्हणे nis:value=बाप्पा_म्हणे nis:enabled=true nis:link/>
कोणत्याही गोष्टीकडे आकर्षित होण्याआधी सावध व्हा. शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका.

<nis:link nis:type=tag nis:id=बाप्पा_म्हणे nis:value=बाप्पा_म्हणे nis:enabled=true nis:link/>
यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या मंडळाची मिरवणूक ठरू शकते एक आदर्श उदाहरण!

पालघर जिल्हा पोलीस दल व मुंबई तरुण भारत यांच्या सहकार्याने आयोजित ‘सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक स्पर्धा २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि शिस्त, सुरक्षा, परंपरा, पर्यावरणपूरकता व जनजागृती यांचा आदर्श घडवा.

सर्व गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, ही मनःपूर्वक विनंती.

गणपती बाप्पा मोरया!
ATM कार्डची अदलाबदल करून ₹50,000 ची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपीकडून ₹38,000 रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले.

नागरिकांनी ATM वापरताना सतर्क राहावे आणि आपले कार्ड, PIN किंवा इतर बँकिंग माहिती कोणासही देऊ नये.
गणपती विसर्जन मिरवणूकीचे अनुषंगाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वाहतूक नियंत्रण अधिसूचना.
बाप्पाची नजर नेहमी मूषकाकडे असते, तशीच गर्दीत तुमचीही नजर मौल्यवान वस्तूंकडे असू द्या.

<nis:link nis:type=tag nis:id=बाप्पा_म्हणे nis:value=बाप्पा_म्हणे nis:enabled=true nis:link/>
जागतिक वाहनचालक दिनानिमित्त सर्व वाहनचालकांना मनःपूर्वक शुभेच्छा. 
प्रवासी आणि माल सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचवताना दाखवलेल्या संयम, शिस्त आणि जबाबदारीबद्दल आपले मनापासून अभिनंदन.

वाहतुकीचे नियम पाळूया आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देऊया.
बाप्पाचे नाव घेऊन प्रवासाचा श्रीगणेशा करता, तर दुर्वेसारखा हिरवा रंग पुढे जाण्याचा संकेत देतो आणि जास्वंदासारखा लाल रंग थांबण्याचा मंत्र सांगतो, हे का विसरता?

<nis:link nis:type=tag nis:id=बाप्पा_म्हणे nis:value=बाप्पा_म्हणे nis:enabled=true nis:link/>
गणेश विसर्जनाच्या गर्दीत हरवलेले दोन चिमुकले केळवा पोलिसांना आढळले. तत्पर शोधमोहीम राबवून दोन्ही मुलांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांची विशेष काळजी घ्या आणि त्यांना एकटे सोडू नका.

सतर्क रहा, सुरक्षित रहा.

<nis:link nis:type=tag nis:id=palgharpolice nis:value=PalgharPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kelwapolice nis:value=KelwaPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=publicsafety nis:value=PublicSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshvisarjan nis:value=GaneshVisarjan nis:enabled=true nis:link/>
यंदा मोह फक्त मोदकाचाच, अंमली पदार्थांचा नाही. नशेला नाकारा आणि सुदृढ आयुष्य निवडा.

<nis:link nis:type=tag nis:id=बाप्पा_म्हणे nis:value=बाप्पा_म्हणे nis:enabled=true nis:link/>
गणेशोत्सवात कुटुंब एकत्र आलं आहे, तर सुरक्षिततेची गोष्टही नक्की करा.
घरातील ज्येष्ठांना फसव्या लिंक आणि कॉल्सबद्दल जागरूक करा.

एका चुकीच्या क्लिकमुळे उत्सवाचा आनंद गमावू नका.

सायबर फसवणूक झाल्यास 1930 वर कॉल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=सावध_राहा_सतर्क_राहा nis:value=सावध_राहा_सतर्क_राहा nis:enabled=true nis:link/>
बाप्पाच्या स्वागतासाठी पालघर सज्ज आहे, आणि आपल्या सुरक्षिततेसाठी पालघर पोलीसही सज्ज आहेत.

उत्सव साजरा करा आनंदाने, नियम पाळा जबाबदारीने.

गणपती बाप्पा मोरया! 🙏
गणेशोत्सवानिमित्त पालघर, बोईसर, मनोर व डहाणू परिसरात काही मार्गांवर वाहतूक निर्बंध व पर्यायी मार्ग लागू करण्यात आले आहेत.

नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

<nis:link nis:type=tag nis:id=वाहतुक_नियंत्रण_अधिसुचना nis:value=वाहतुक_नियंत्रण_अधिसुचना nis:enabled=true nis:link/>
वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी चोरी करून पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.